कन्या फाऊंडेशन या सामाजिक/विधायक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे नुकतेच नूतन जागेत स्थलांतर करण्यात आले आहे.

   कन्या फाऊंडेशन ही नोंदणीकृत, मान्यताप्राप्त स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आहे. भारत सरकारच्या “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या अभियानास समर्पित राहून कन्या फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण, महिला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारचे विधायक, समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहे. या कार्यास आपलाही मदतीचा हात लागावा, आपलाही सहभाग असावा, एवढीच अपेक्षा.

  कोरोनाच्या महामारीनंतर अनेक अडचणींवर मात करीत कन्या फाऊंडेशनच्यावतीने समाजातील अनेक निराधार, बेरोजगार, असाह्य आणि दुर्बल घटकातील मुले-मुली-महिलांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबविले आहे. यापुढेही सामाजिक कार्याचा वसा आपणा सर्वांच्या मदतीने राबविण्याचा प्रयत्न केले जात आहे. समाजातील दुर्बल घटकांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी हा एक छोटासा प्रयत्न  आहे.

कन्या फाऊंडेशनच्या या कार्यासाठी आपणाकडून आर्थिक पाठबळ आणि अर्थसाहाय्याची गरज आहे. कन्या फाऊंडेशनचे नूतन जागेत स्थलांतर केल्याने अनेक प्रकारच्या  सोयी-सुविधा आणि गैरसोयी होत आहे. या सर्व अडीअडचणींवर मात करता यावा, महिला सक्षमीकरण आणि महिला-मुलींच्या सर्वांगीण विकास साधता यावा, यासाठी आपणाकडून मदतीची अपेक्षा आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *